
सणाच्या काळात वीज पुरवठा अखंडित व सुरळीत ठेवण्यासाठी युद्ध पातळीवर काम करण्याचे महावितरण कोकण परिमंडळाचे नुतन मुख्य अभियंता विजय भटकर यांचे निर्देश
महावितरण कोकण परिमंडळाचे नुतन मुख्य अभियंता विजय भटकर यांनी मंगळवारी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील वीज अधिकाऱ्यांशी दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधत आढावा घेतला.तसेच संपूर्ण कोकण पट्ट्यात गणेशोत्सव हा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. या सणाच्या काळात वीज पुरवठा अखंडित व सुरळीत ठेवण्यासाठी युद्ध पातळीवर काम करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिका-यांना दिले.
भटकर यांनी मंगळवारी कोकण परिमंडळ, रत्नागिरी येथील मुख्य अभियंता या पदाचा कार्यभार देवेंद्र सायनेकर यांच्याकडून स्वीकारला. भटकर यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज अधिकाऱ्यांशी दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधत मार्गदर्शन केले आणि मागील काळात कोकणातील वीज कामगारांनी अविरत परिश्रम करून नैसर्गिक आपत्तीत वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचा गौरव केला.
www.konkantoday.com