परराज्यात जाण्यासाठी आरोग्य तपासणी साठी जिल्हा रुग्णालयात गर्दी
परजिल्ह्यात आणि परराज्यात जाण्यासाठी शासनाने परवानगी दिल्यानंतर जाण्याआधी आरोग्य तपासणी करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी शासकीय रुग्णालयातून तपासणी करणे आणि आपण शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहोत, याचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे फिटनेस सर्टिफिकेट मिळविण्यासाठी रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात एकच गर्दी झाली. पहिल्याच दिवशी साडेचारशे सर्टिफिकेट देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बोल्डे यांनी दिली.
www.konkantoday.com