प्रवाशांच्या चोरीची तक्रार घेण्यास विलंब केला कोकण रेल्वेला नुकसान भरपाई देण्याचे आदेश

कोकण रेल्वे मार्गावरील एक्स्प्रेसमधून प्रवास करताना प्रवाशांचे सामान चोरीला गेले मात्र ही तक्रार नोंदवण्यास चार ते पाच महिन्यांचा विलंब लावल्याने राज्य ग्राहक तक्रार निवारण मंचाने कोकण रेल्वे प्रशासनाला नुकसान भरपाई म्हणून एक लाख दहा हजार रुपये देण्याचे आदेश दिला वसई येथील राहणारे उन्नीकृष्णन नायर हे पत्नी व मुलांसह त्रिवेंद्रम नेत्रावती एक्स्प्रेसमधून प्रवास करीत होते प्रवासाच्या वेळी त्यांचे बॅग चोरीला गेली त्यामध्ये पाच लाखांचे सामान होते हा प्रकार लक्षात आल्यावर त्याने टीसी व रेल्वे पोलिसांना शोधण्याचा प्रयत्न केला मडगाव येथे उतरल्यानंतर त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली ठाण्याला हल्ल्यावर त्यांनी कोकण रेल्वे मुख्यालयात तक्रार केली तेव्हा त्यांना ठाणे आरपीएफकडे तक्रार करण्यास सांगितले ठाणे आरपीएफने ही तक्रार कारवार येथे पाठविली त्यांनी हे प्रकरण आपल्या हद्दीत येत नसल्याचे सांगून तक्रार घेण्यास टाळाटाळ केली या सर्व प्रकरणात तक्रार घेण्यातच चार पाच महिने घालवण्यात आले झालेल्या मनस्तापाबद्दल नायर यांनी राज्य ग्राहक मंचाकडे तक्रार केली राज्य ग्राहक तक्रार निवारण समितीने प्रवाशाला झालेल्या मानसिक त्रासापोटी एक लाख रुपये नुकसानभरपाई केस लढण्यासाठी आलेला दहा हजार रुपये खर्च देण्याचे आदेश कोकण रेल्वेला दिले

Related Articles

Back to top button