एसटी महामंडळाच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला १५ ऑगस्ट २०२० पर्यंत मुदतवाढ
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला १५ ऑगस्ट २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, याबाबची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे.
राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २७ विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यामध्ये ३३ टक्के ते १०० टक्के पर्यंत सवलत देण्यात येत आहे. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडीत असलेल्या ‘स्मार्ट कार्ड’ काढण्याची योजना एसटीने यापूर्वीच सुरु केलेली आहे.
www.konkantoday.com