
अन्यथा रत्नागिरी जिल्हा ऑरेंज झोनमधून रेडझोनमध्ये जाण्यास वेळ लागणार
सोशल डिस्टन्सिंगचे किमान बंधन प्रत्येकाने पाळले पाहिजे अन्यथा रत्नागिरी जिल्हा ऑरेंज झोनमधून रेडझोनमध्ये जाण्यास वेळ लागणार नाही.शिथिलतेचा अतिरेक किंवा गैरफायदा नागरिकांनी घेऊ नये. शिथिलतेमुळे काही अडचणी निर्माण झाल्यास ही शिथिलता बंद होऊ शकते. सोशल डिस्टन्सिंगचे किमान बंधन प्रत्येकाने पाळले पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने नियमांचे पालन करावे, कोरोनाविरूद्धचा लढा एकजुटीने लढण्याचे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बघाटे यांनी केले आहे.
जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी व जिल्हा बाहेरील लोकांना जिल्ह्यात येण्यासाठी आवश्यक माहिती उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सोमवारी सकाळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नांना उत्तर दिली यावेळी त्यांनी सांगितले की, बाहेरून येणाऱ्यांचे स्वागत करा. रेडझोनमधून येऊ शकतो का? या प्रश्नावर जिल्हाधिकारी मिश्रा यांनी रेडझोनमधून कोणीही येऊ शकणार नसल्याचे सांगितले. कंटेनमेंट झोनच्या बाहेर असाल तर जवळच्या पोलीस स्थानकाकडे अर्ज करावा. त्यानंतर संपूर्ण माहिती घेऊन परवानगी देण्याबाबत विचार होईल, असे सांगितले.
कोरोनाबाधित रूग्णाच्या संपर्कात एखादी व्यक्ती आली असेल किंवा हॉटस्पॉटमध्ये व्यक्ती जाऊन आलेली असेल अशा लोकांना क्वॉरंटाईन होणे आवश्यक आहे, अशी माहिती कान्हुराज बघाटे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
www.konkantoday.com