पंपचालकांना सीएसआर फंडातून आर्थिक मदत व्हावी
लॉकडाऊनमुळे पेट्रोल, डिझेलची विक्री फक्त १०टक्के होत आहे. या स्थितीत पेट्रोल पंपचालक अडचणीत आले आहेत. कर्मचार्यांना पूर्ण पगार, बँक चार्जेस, कर्जाचा हप्ता भरणे, विविध शुल्क व दंड भरणे या गोष्टी सांभाळणे पंपचालकांना कठीण झाले आहे. त्यामुळे सीएसआर फंडातून आर्थिक मदत व्हावी, अशी मागणी फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी केली आहे. तसेच ही मदत तत्काळ न मिळाल्यास बहुसंख्य डिलर्स कोलमडणार आहेत. व्यवसाय चालू ठेवणे शक्य होणार नाही. यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था ढासळू शकते, अशी भीतीसुद्धा व्यक्त केली आहे.
www.konkantoday.com