
मिरकरवाडा बंदरात मत्स्य व्यवसाय विभागाकडुन चुकीच्या कारवाईबद्दल मच्छिमार वरिष्ठांकडे व मंत्र्यांकडे तक्रार करणार
रत्नागिरी तालुका पर्ससीन मालक असोशिएशन व जिल्हा मच्छिमार संघ या दोन संघटनांचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.
पहिल्या चार महिन्यांच्या मासेमारी हंगामातील अडीज महिने विविध नैसर्गिक आपत्तीमुळे मासेमारीसाठी नौका समुद्रात जावू शकल्या नाहीत. उर्वरित कालावधीत खर्चाइतकी मासळीच मिळाली नाही. लॉकडाऊनमुळे एक महिनाभर नौकांना खोल समुद्रातील मासेमारीही करता आली नाही. नौका बंद असतानाही नौकांवर काम करणार्या खलशांना त्यांचे पगार द्यावेच लागले. कोट्यवधीचे असे नुकसान झाले असतानाच पुन्हा आता मिरकरवाडा बंदरात कारवाईचा बडगा उचलला जावू लागला. त्यामुळे दोन्ही संघटना संतप्त झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर या दोन्ही संघटनांच्या प्रमुख पदाधिकार्यांची बैठक झाली.मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त भादूले यांच्यासह पथकाकडून होणार्या बंदरातील चुकीच्या कारवाईबद्दल वरिष्ठांकडे व मंत्र्यांकडे तक्रार करण्याचे ठरले आहे.
www.konkantoday.com