रेडी बंदरात इंडोनेशिया येथून आलेल्या जहाजाला रेडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून जोरदार विरोध


रेडी पोर्ट येथे इंडोनेशिया येथून मुंबईमार्गे एक जहाज मायनिंग वाहतूककरिता दाखल झाले आहे. दरम्यान, या जहाजाला रेडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून जोरदार विरोध करण्यात आला असून या जहाजाला परत पाठविण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या जहाजावर कॅप्टनसह २१ परदेशी कामगार असून त्यांची तेथे जाऊन जिल्हा आरोग्य विभागामार्फत तपासणी करण्यात आली.त्यांना कोणताही कोरोना संदर्भात त्रास नसल्याने बोटीवरील काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, यावर असलेले कामगार हे बाहेरील असल्याने या बोटीवर काम करण्यासाठी जाणाऱ्या स्थानिक लोकांच्या जीवितास धोका होऊ शकतो. मुंबईवरून आलेल्या कामगारांसह अधिकाऱ्यांना क्वारंटाईन करा. जहाज भरू देणार नाही. जहाज माघारी पाठवा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button