
रत्नागिरी विमानतळाचा प्रश्न 90 टक्के सुटला आहे : केंद्रीय राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा
रत्नागिरी : येथील विमानतळाचा प्रश्न 90 टक्के सुटला आहे. हा विमानतळ सध्या कोस्टगार्डच्या ताब्यात आहे. त्यामुळे संरक्षण दृष्ट्या काही गोष्टी करणे अद्याप शिल्लक आहेत. त्या गोष्टीही लवकरच पूर्ण होतील. मागील राज्य सरकारने जागेच्या विषयात विलंब केला होता. आता हे सर्व प्रश्न सुटतील, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी रत्नागिरी येथे सांगितले. रत्नागिरी-सिंधुदुर्गसह राज्यातील सोळा लोकसभा मतदारसंघात विकासात्मक आणि संघटनात्मक स्थिती मजबुतीसाठी भाजपकडून आयोजित करण्यात आलेल्या लोकसभा प्रवास योजनेच्यानिमित्ताने रत्नागिरीत आलेल्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला.
यावेळी त्यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष अॅड.दीपक पटवर्धन, मा. आमदार राजन तेली, माजी आमदार बाळ माने, अतुल काळसेकर, अॅड. बाबासाहेब परुळेकर, सचिन वहाळकर उपस्थित होते.