महिलेला मुंबईहून सिंधुदुर्गात सोडण्यासाठी आलेला चालक कोरोना पॉझिटिव्ह,कोल्हापूर येथील सीपीआर अतिदक्षता विभागामध्ये दाखल
मुंबईहून सिंधुदुर्ग ओटवणे येथे बाळंतपणासाठी आणलेल्या महिलेला सोडणाऱ्या कारचा भुदरगड आकुर्डी येथील चालक पॉझिटिव्ह निघाल्याची खळबळजनक माहिती प्राप्त झाली आहे. सदर महिलेला सावंतवाडी येथील शासकीय विश्रामगृहावर विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.सध्या या महिलेची प्रसूती झाली असून ती ओरोस येथील शासकीय रुग्णालयात आहे. मात्र, सदर महिलेचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आहे.ओटवणे येथील महिलेला सोडायला आलेला हा चालक कोल्हापूर भुदरगड आकुर्डी येथील असून मुंबई तो चालक म्हणून काम करतो. सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे गावातील गरोदर महिलेला घेऊन तो मुंबईतून आला होता.त्यानंतर सदर महिलेला ओटवणे येथे सोडून तो आपल्या गावाकडे गेला होता. तेथे त्याची तपासणी करून त्याला कडगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. मात्र, १४ दिवस पूर्ण होण्याआधीच दहाव्या दिवशी त्याच्या घशात खवखव होऊन त्याला ताप आल्यामुळे त्याचे स्तरावर घेण्यात आले होते. दरम्यान मिरजेच्या प्रयोगशाळेतून रात्री उशिरा आलेल्या अहवालात तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रात्री उशिरा त्याला कोल्हापूर येथील सीपीआर अतिदक्षता विभागामध्ये हलविण्यात आले आहे.
सदर चालक सिंधुदुर्गात अन्य कोणाच्या संपर्कात आला होता का यासाठी आता प्रशासन सज्ज झाले असून त्याबाबत माहिती घेत आहे.
www.konkantoday.com