कुडाळ येथे जाणाऱया चाकरमान्यांच्या गाडीला अपघात सहा जण जखमी

मुंबई गोवा महामार्गावर कोंडमळा येथे कार व बस यांच्यात झालेल्या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत परेल येथील महाडेश्वर कुटुंबीय आपल्या कुडाळ येथील गावाकडे कारने जात होते कोंडमळा येथे आली असता देवरुख येथून मुंबईकडे जाणाऱ्या आरामबसची धडक बसली या अपघातात कारमधील सुबोध महाडेश्वर पल्लवी महाडेश्वर जयवंत पुणेकर मैथली पुणेकर अस्मी पुणेकर अरुण पुणेकर हे जखमी झाले असून त्यांच्यावर डेरवण येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत हे एकाच कुटुंबातील सदस्य कुडाळ येथे धार्मिक कार्यासाठी चालले होते

Related Articles

Back to top button