अत्यावश्यक सेवेच्या वाहनांमधून प्रवाशी वाहतूक रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उचलली कठोर पावले
काेकणातअत्यावश्यक सेवेच्या वाहनांमधून होत असलेली प्रवाशी वाहतूक रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलायला सुरवात केली आहे.प्रवासी वाहतूक करणारे एकही वाहन जिल्ह्यात प्रवेश करु नये यासाठी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी येथे मुंबई, पुणे यासारख्या शहरातून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. त्यामुळे कशेडी घाटात अनेक वाहने थांबली हाेती
मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यानेकोकणातील चाकरमान्यांना गावी यायचे वेध लागले आहेत. मिळेल त्या वाहनांने हे चाकरमानी गावी यायचा प्रयत्न करू लागले आहेत मात्र संचारबंदी असल्याने अत्यावश्यक सेवेची वाहनातुन येत आहेत
www.konkantoday.com