दररोज सरासरी १ लाख ३८ हजार साईभक्त घरात बसून घेत आहेत साईबाबांचं दर्शन
लॉकडाऊनमध्ये मंदिरे बंद झाली असली तरी लॉकडाऊन काळात ५५ लाख भाविकांनी साईबाबांचं ऑनलाईन दर्शन घेतलं. तर साईबाबा मंदिर ट्रस्टला १ कोटी ८० लाखांची देणगी लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये मिळाली आहे.
दररोज सरासरी १ लाख ३८ हजार भक्त घरात बसून साईबाबांचं दर्शन घेत आहेत. वेबसाईट, मोबाईल अॅप आणि डिश टीव्हीच्या अशा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून भाविक साईबाबांचं दर्शन घेत आहेत अशी माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली आहे.
www.konkantoday.com