
जिल्हा बंदी मोडून चाकरमान्यांना कोकणात आणण्याचे प्रकार सुरूच , दापोलीत वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबईत असलेले चाकरमानी कोकणात आपल्या गावात येण्यासाठी प्रयत्न करीत आहेत जास्त पैसे मोजून मिळेल त्या वाहनाने ते कोकणात येत आहेत मुंबई मानखुर्द येथील सुभाष चौगुले याने आपल्या वॅगनार मधून मुंबईत येथून दापोली पांगारवाडी येथे वेदांत भांबीड व रुतुजा भांबीड यांना आणून सोडले त्यानंतर चालक परत मुंबईत निघून गेला ही घटना पोलीस पाटलांना कळल्यावर त्यांनी याबाबतचे पत्र तहसीलदारांना दिले गाडीतून आलेल्या दोघांनाही कोकण कृषी विद्यापीठात क्वारंटाइन करण्यात आले आहे गाडी घेऊन चालक परत मुंबईत गेल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
www.konkantoday.com