
जय हिंद! भारत माता की जय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. आज म्हणजेच ७ मे रोजी दुपारी १:३० वाजता भारताने पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे.भारताने पाकिस्तानमधील ९ ठिकाणी हल्ला केला. या हल्ल्यात ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हल्ल्यानंतर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन पहिली प्रतिक्रिया दिली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ट्विटमध्ये जय हिंद! भारत माता की जय… या मोजक्या शब्दात आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
हल्ल्यानंतर, भारतीय सैन्याने इंस्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले, जय हिंद, न्याय झाला आहे. ही कारवाई सुरू करण्यापूर्वी, सैन्याने हल्ला करण्यास तयार, जिंकण्यासाठी प्रशिक्षित अशी पोस्ट केली होती.
संरक्षण मंत्रालयाने सोशल मीडियावर पोस्ट करून या हल्ल्याची माहिती दिली. पाकिस्तानविरुद्ध केलेल्या या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले आहे. “भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आहे, जे पहलगाम दहशतवादी हल्ल्याला अचूक आणि संयमी प्रत्युत्तर आहे,