
जिल्हयात एकच ध्वजारोहण !
रत्नागिरी दि. 27 : महाराष्ट्र राज्य स्थापनेला 01 मे 2020 रोजी 60 वर्षे पूर्ण होत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी राज्यात महाराष्ट्र दिन हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या दृष्टिने निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार सदर कार्यक्रम 01 मे 2020 रोजी सकाळी 08.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर दिवशी फक्त जिल्हा मुख्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी या ठिकाणी वर्धापन दिन समारंभ करण्यात येणार असल्याने इतर कुठल्याही कार्यालयात सदर कार्यक्रम आयोजित करु नये. तसेच याबाबत आपल्या अधिनस्त कार्यालय, विभागांना आपल्या स्तरावरुन सूचित करण्यात यावे असे तहसीलदार (सर्वसाधारण) , जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांनी कळविले आहे.