
रत्नागिरी नाचणे रेशन दुकानावर केशरी कार्डावर धान्य वाटपाला सुरवात
नाचणे रेशन दुकानावर आज पासून केसरी कार्डावर धान्य देण्यास सुरवात करण्यात आली.ग्राहकांनी सोशल डीटन्स पाळून रांग लावून शांततेत धान्य घेण्यास सुरवात केली.त्या साठी धान्य वाटप करण्याकरीता नाचणे ग्रामपंचायतीच्या सरपंच जयाली घोसाळे यांनी कार्डधारकांनी सोशल डिटन्स पाळून धान्य घ्यावे याच्यावर कटाक्ष ठेवून ग्रामपंचायतीचा कर्मचारी मदतनीस संभाची देसाई यांना मदतीकरता पाठवले. यावेळी रेशन दुकान चालक शैलेंद्र कांबळे हे सर्व नियमांचे पालन करून कार्डधारकांना धान्य देत हाेते.
www.konkantoday.com