रत्नागिरी एसटी विभागाला २६ कोटी बारा लाखांचा फटका
कोरोना वाढत्या प्रादुर्भावाचा फटका एसटी महामंडळला बसला आहे.लॉकडॉउनमुळे एसटीच्या रत्नागिरी विभागाचे दिवसाचे ७० लाख रु.चे नुकसान होत आहे.त्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या एसटीला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.दि. २२ मार्चपासून एस्टीची सेवा पूर्णपणे बंद आहे.त्यामुळे गेल्या ३६ दिवसात एसटी चे २५ कोटी ९० लाख रु.चे नुकसान झाले आहे.तर लॉकडाऊन पूर्वी २२ लाख रु.चे नुकसान झाले होते. त्यामुळे रत्नागिरी एसटी विभागाचे नुकसान २६ कोटी १२ लाखांवर पोहचले आहे.
www.konkantoday.com