
रत्नागिरी परिसरातील मोकाट गुरांचे अन्नदाते राजू जाधव व त्यांचे सहकारी
रत्नागिरी शहरात सध्या नागरिकांची वर्दळ पूर्णतः थांबल्याने शहर परिसरातील मोकाट गुरांच्या खाण्या-पिण्याची पंचाईत झाली. अशा वेळी रत्नागिरीतील राजू जाधव यांनी त्यांच्या सहकार्यांसह गेले पंधरा दिवस गुरांना खाण्यासह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करुन देत माणुसकीचे दर्शन घडवले आहे जिल्हा परिषदेत कामाला असलेले जाधव दिवसा शासकीय कामगिरी बजावल्यानंतर सायंकाळी या उपक्रमात स्वतःला वाहून घेतले आहे त्यांना त्यांचे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी बाबल्या सावंत, सुधीर सावंत, दीपक कांबळे, पिंट्या सावंत यांची साथ लाभली. गेले दहा दिवस कधी गवत, तर कधी पाव, जे काही उपलब्ध होईल ते त्या जनावरांना देत होते. सुरवातीला खाण्याचा प्रश्न सुटला, पण पिण्याच्या पाण्याचे काय? मग पाण्याचा टँकर भाड्याने घेऊन त्यांनी झाडगाव, काँग्रेस भुवन, आठवडा बाजार, माळानाका परिसरात फिरून या मुक्या जनावरांची तहान भागवली.त्याच्या या कामाचे काैतुक हाेत आहे
www.konkantoday.com