
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कारखाने चालू कसे? -सचिन कदम
दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना लोटे औद्योगिक वसाहतीमधील घरडा केमिकल्समध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. सर्वसामान्यांसाठी लॉकडाऊन असताना कोरोना रूग्ण पॉझिटीव्ह असलेला कारखाना चालू कसा? जर या कारखान्याचे उत्पादन थांबवून कोरोना साखळी तोडण्यास सहकार्य केले नाही तर शिवसेना स्टाइलने उत्तर दिले जाईल असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी दिला आहे.
konkantoday.com