
रत्नागिरी तालुक्यातील सांडे लागवण जवळ खाडीत कालवे काढण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील चाफेरी गावातील दोन जण आज सकाळी कालवे काढण्यासाठी खाडीत उतरले असता ओहोटीचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला
यातील चाफेरी गावातील जाणारे दोघे जण सांडे लागवड येथील खाडीवर कालवे करण्यासाठी खाडीत उतरले होते दरम्यान खाडीत ओहोटीचा प्रवाह सुरू झाला त्यात सापडल्याने हे दोघेजण बुडाले सकाळी साडेसहा वाजता हा प्रकार घडला याठिकाणी मच्छीमारी करत असणारे सांडे लागवड येथील नरेश पाष्टे यांनी घटना पाहिल्यावर त्यांनी आरडाओरड करून घटनास्थळी होडी वळवली परंतु तोपर्यंत दोघेही बुडाले होते
संतोष पिंपळे व संजय गुरव अशी बुडाल्याचीनावे आहेत त्यांचा शोध सुरू आहे
www.konkantoday.com