
राजापुरातील त्या धोकादायक स्पॉटच्या दुरुस्तीला चालना,रत्नसिंधु समितीचे सदस्य किरण सामंत यांनी केली पाहणी
राजापूर, शहरातील राजापूर एसटी डेपोसमोरील भागात मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडलेले आहे. हा परिसर वाहनचालक आणि प्रवाशांच्यादृष्टीने धोकादायक झाला आहे. त्यातून एकप्रकारे अपघाताला आमंत्रण ठरत आहे. या रस्त्याची सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत यांनी पाहणी करून सार्वजनिक बांधकामासह महामार्ग विभागाच्या अधिकार्यांसह ठेकेदारांशी संपर्क साधून या ठिकाणी तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी सूचना केली.तालुक्यातील वाटूळ ते पन्हळे या सुमारे ३७ किमीच्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून, दुतर्फा वाहतूकही सुरू आहे. शहरातील एसटी डेपोसमोरील कामाचा अद्यापही तिढा सुटलेला नाही. या ठिकाणी भुयारी मार्ग करायचा की, जंक्शन उभारायचे या वादात येथील काम रखडले आहे. त्याचा फटका या भागातून प्रवास करणार्या वाहनचालकांसह प्रवाशांना बसत आहे. हा परिसर अपघातप्रवणक्षेत्र झाला आहे. येथील रखडलेले काम वेळेत मार्गी लावावे, अशी मागणी प्रवाशांसह वाहनचालकांकडून होत आहे.www.konkantoday.com