अल्पवयीन मुलीशी शरीर संबंध ठेवत मातृत्व लादले, आराेपी विरोधात गुन्हा दाखल
राजापूर तालुक्यातील बारसू गावात एका ४५ वर्षीय इसमाने अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून शरीर संबंध ठेवत तरूणीवर मातृत्व लादले आता हा धक्कादाय प्रकार समोर आला आहे. त्यामुळे राजापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान याबाबत पिडीत मुलीने राजापूर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी जगन्नाथ सदाशिव बगाडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पिडीत मुलीच्या घरी आराेपीचे नेहमीच येणे-जाणे होते.मुलीच्या घरी कोणी नसताना बगाडे यांनी पिडीत मुलीवर बळजबरीने शारीरीक संबंध ठेवले पीडित आठ महिन्यांची गरोदर असताना राहत्या घरात पिडीत मुलीची प्रसूती झाली.
जन्माला आलेल्या अर्भकाची कोणतीही हालचाल नसल्याने पिडीत मुलीच्या वडीलांनी अर्भक प्लास्टीक पिशवीत भरून बाहेर नेऊन टाकल्याचे पिडीतेने या तक्रारीत म्हटले आहे पोलिसांनी जगन्नाथ सदाशिव बगाडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
www.konkantoday.com