
युवासेना रत्नागिरी (दक्षिण) जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत यांचा उद्या सत्कार
रत्नागिरी : रत्नागिरी तालुका व शहराच्यावतीने नवनिर्वाचित युवासेना रत्नागिरी (दक्षिण) जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत यांचा सत्कार सोहळा उद्या (१८ ऑक्टोबर) सकाळी १०.३० वाजता शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या अभ्युदयनगर येथील संपर्क कार्यालयात येथे आयोजित केला आहे.
यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शिवसेना, महिला आघाडी, युवासेना, शिवसहकार सेना, रिक्षासेना व अंगीकृत सर्व संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन रत्नागिरी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे यांनी केले आहे.




