
खतांमध्ये २५ टक्के भाववाढ
रत्नागिरी ः रासायनिक खतांच्या किंमतीत यावर्षी शासनाने सुमारे २५ टक्के वाढ केली आहे. त्यामुळे शेतकर्यांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे. त्यामुळे शेतात रासायनिक खताऐवजी शेणखत व सेंद्रीय खताचा वापर करण्याचे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत दरवर्षी ५ ते १० टक्क्यांनी वाढत होत्या. मात्र यावर्षी सुमारे २० ते २५ टक्के एवढी वाढ झाली आहे.