
केंद्रीय पथकानेकोरोना नियंत्रणासाठी केलेल्या सूचनांवर तातडीने अंमलबजावणी करा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
केंद्रीय पथकाने राज्यातील विविध ठिकाणांची पाहणी करुन कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या सूचनांवर तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले तसेच राज्यात मुंबई -पुण्यातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा दर कमी करणे आणि रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढवणे याला प्राधान्य असल्याचंही नमूद केलं. यासाठी केंद्रीय पथकाच्या सूचना महत्त्वाच्या असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मुंबई आणि पुण्याच्या केंद्रीय पथकांसमवेत मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली.
www.konkantoday.com