सिंधुदुर्गात रंगला शिव भोजन थाळी विरुद्ध भाजपची कमळ थाळी यांचा सामना
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोणीही भुकेले राहू नये म्हणून राज्यातील शिव भोजन केंद्रांची संख्या व थाळ्याची संख्या वाढविण्याचा निर्णय राज्य सरकार घेतला आहे मात्र त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सिंधुदुर्गात आमदार नीतेश राणे यांनी कमळ थाळीची घोषणा करून ती योजनाही अंमलात आणली आहे राज्य सरकारने शिव भोजन थाळीची किंमत कमी करून पाच रुपये केली आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून नितेश राणे यांच्या कमळ थाळी तर लोकांना मोफत देण्यात येत आहे यामुळे सिंधुदुर्गात दोन थाळ्यांचा सामना रंगला असून शिवसेनेच्या शिव भोजन थाळीला भाजपच्या कमळ थाळीचा उतारा देण्यात आला आहे सिंधुदुर्गात कणकवली वैभववाडी नंतर आता सावंतवाडीत कमळ थाळी सुरू होत आहे या थाळी युद्धात मात्र सामान्य जनतेला फायदा होत आहे
www.konkantoday.com