कायदा तातडीने अध्यादेश काढून मंजूर करा,डॉक्टराचा आज शासनाला ‘पांढरा इशारा’ देऊन निषेध
इंडियन मेडिकल असोसिएशनचे संपूर्ण देशभरातील चार लाख डॉक्टर आज २२ एप्रिल रोजी शासनाला ‘पांढरा इशारा’ देऊन निषेध
नोंदवणार आहेत. यामध्ये बुधवारी, २२ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता भारतातील सर्व डॉक्टर पांढरा एप्रन घालून पांढरी मेणबत्ती लावणार आहेत. डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याविरोधात प्रस्तावित असलेला कायदा तातडीने अध्यादेश काढून मंजूर करावा, अशी मागणी या माध्यमातून केली जाणार आहे मात्र कोरोनाच्या लढ्यात डॉक्टर आपले काम थांबवणार नाहीत,
www.konkantoday.com