महाराष्ट्रात आतापर्यंत १२टक्के रुग्णांची कोरोनावर मात – आरोग्य मंत्री राजेश टोपे
महाराष्ट्रात आतापर्यंत १२टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ८१ टक्के कोरोनाबाधित रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत. ते रुग्णालांमध्ये निवांत बसून आहेत. ते निवांत टीव्ही बघत आहेत आणि वृत्तपत्रे वाचत आहेत. लक्षणे असणाऱ्या रुग्णांची संख्या १७टक्के आणि आयसीयूमध्ये असणाऱ्यांची संख्या २ टक्के आहे. त्यामुळे घाबरुन जाऊ नका. काही लक्षणे आढळल्यास स्वत:हून टेस्टसाठी पुढे या, असं आवाहन महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं
www.konkantoday.com