रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा कोरोना विरूध्दच्या लढ्यात सहकार्याचा हात
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने कोरोना विरूध्दच्या लढ्यात सहकार्याचा हात दिला आहे.जिल्हा शासकीय रूग्णालयात व्हेंटिलेटर खरेदीसाठी जिल्हा बॅंकेने १३ लाख ३६ हजार ४००रूपयांची मदत दिली असून त्यामदतीचा धनादेश शनिवारी बॅंकेने पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्याकडे सुपूर्द केला आहे.जिल्हा रूग्णालयात व्हेंटिलेटर खरेदीसाठी बॅंकेने १३ लाख ३६ हजार ४०० रूपयांची मदत दिली आहे.बॅंकेचे कार्यकारी संचालक सुनील गुरव,सरव्यवस्थापक अजय चव्हाण, जनसंपर्क अधिकारी संदीप तांबेकर यांनी मदतीचा धनादेश पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्याकडे सपुर्द करण्यात आला आहे.यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, आमदार राजन साळवी, शेखर निकम आणि हुस्नबानू खलिफे उपस्थित होते.
www.konkantoday.com