
चिपळूण तालुकाप्रमुख विनोद झगडे यांचा शिवसेना उबाठा पक्षाला ’जय महाराष्ट्र’
गेली साडेतीन वर्षे अत्यत प्रामाणिकपणे पक्षाचे काम करणारे, चिपळूण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकर पक्षाचे तालुकाप्रमुख विनोद प्रकाश झगडे यांनी अखेर गुरूवारी आपल्या पदासह सक्रिय सदस्यत्वाचा देखिल राजीनामा देत पक्षाला अखेरचा ’जय महाराष्ट्र’ केला आहे. स्वतः आयोजित केलेल्या तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत आपल्या भावना आणि सर्व शिवसैनिकांचे ऋण व्यक्त करून त्यांनी आपला राजीनामा जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर यांच्याकडे सुपुद केला. दरम्यान, अतिशय शांत, संयमी आणि निष्ठावंत शिवसैनिक अशी ओळख असलेल्या झगडे यांनी तडकाफडकी दिलेला राजीनामा कार्यकत्यांच्या जिव्हारी लागला असून त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळातही एकच खळबळ उडाली आहे.www.konkantoday.com