पुण्यामध्ये होम क्वारंटाइन करून ठेवलेला तरुण हरचेरी गावात फिरताना आढळला म्हणून गुन्हा दाखल
पुण्यात होम कोरं टाइन शिक्का मारलेला असताना देखील व जिल्हा बंदी असताना देखील पुण्याहून हरचेरी गावात येऊन गावात फिरत असल्याबद्दल आदेश साळवी (कुंभारवाडी हरचेरी)यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आदेश हा पुणा येथे राहतो पुण्यात असताना त्याच्या हातावर होम कोरं टाईन म्हणून शिक्का मारण्यात आला होता व त्याला घरात थांबण्यास सांगण्यात आले होते तरी देखील आदेश घरी हरचेरी येथे आला याबाबतची माहिती सरपंच व कोरोना कृती दल समितीच्या अध्यक्ष असलेल्या साै.देवयानी पांचाळ यांना कळल्यावर त्यानी आदेश याच्या घरी जाऊन माहिती घेतली परंतु आदेश याने व्यवस्थित उत्तर न दिल्याने त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आणण्यात आले तेथील डॉक्टरानी त्यांना गावात घरातच राहण्याचा सल्ला दिला असताना देखील आरोपी हा हरचेरी गावात आल्या नंतर बँकेमध्ये फिरत असल्याचे आढळून आला अशा प्रकारामुळे गावातील लोकांना संसर्गाचा धोका असल्याने आदेश याच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
www.konkantoday.com