राजापूर शहरात अनेकजण आपल्याबरोबरच इतरांनाही असुरिक्षत करत आहेत
कोरोनाच्या बाबतीत राजापूर तालुका आजही सुरक्षित तालुका म्हणून ओळखला जात आहेत. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून सांगितल्या जाणाऱ्या काही महत्वपुर्ण सूचनांचेही राजापूर शहरात काही नागरिक, व्यापारी पालन करत नसल्याने ही मंडळी आपल्याबरोबरच इतरांनाही असुरिक्षत करत आहेत. राजापूर शहरात अनेकजण मास्क वा रूमाल न लावता बिनधास्तपणे फिरत असून सोशल डिस्टंसचेही नियम धाब्यावर बसविले आहेत.
www.konkantoday.com