राजापूर तालुक्यातील छोटे आंबा बागायतदारांची चिंता
कोकण जनकल्याण प्रतिष्ठानने मिटवली

सध्याच्या परीस्थिमुळे छोट्या बागायतदारांकडील आंबा कोणी उचलायला पुढे येत नव्हते. त्यामुळे राजापूर तालुक्यातील छोटे आंबा बागायतदार अधिक चिंतेत होते. त्यांना दिलासा देण्यासाठी कोकण जनकल्याण प्रतिष्ठानने त्यांचा आंबा खरेदी करण्याची तयारी दर्शवत हा आंबा बाजारात ना नफा ना तोटा या तत्वावर विक्रीसाठी उपलब्ध केला आहे.
तालुक्यातील छोट्या आंबा बागायतदारांकडील आंबा खरेदी करून पुणे, मुंबई, कोल्हापूर आदी भागामध्ये दलालांची साखळी न वापरता विक्रीसाठी आणला आहे. कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्या या उपक्रमाला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर यानी दिली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button