
हा रत्नागिरीकर तरुण देतोय दररोज भटक्या प्राण्यांना खाणं . . .
सध्या सर्वत्र कोरोनाच्या प्रभावामुळे लॉकडाउन आहे.लॉकडाउन असल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.समाजातील गरीब वर्गाला धान्य व जेवणाची मदत करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत.लॉकडाउनचा मोठा फटका भटक्या प्राण्यांना देखील बसला आहे.सर्वत्र बंद असल्यामुळे त्यांच्या खाण्याचा प्रश्न उभा राहीला आहे.यातच आता रत्नागिरीतील अथर्व भागवत यांनी स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.दररोज रत्नागिरी शहर व परिसरातील शंभरहून अधिक भटक्या कुत्रे/मांजरे यांच्या खाण्याची व्यवस्था त्याच्या माध्यमातून केली जात आहे.यामुळे अथर्व आता या मुक्या प्राण्यांचा देवदूत बनला आहे असे म्हणायला काही हरकत नाही.अथर्व सध्या पशु वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत असून त्याचे वडील रत्नागिरीतील व्हेटरनरी सर्जन आहेत.या भटक्या प्राण्यांच कुणीही नसत त्यामुळे आपणच त्यांची मदत केली पाहिजे.या उपक्रमांमध्ये तुमच्या सगळ्यांची साथ व मदत लागणार आहे त्यामुळे आपणही या उपक्रमात आम्हाला मदत करून सहभागी व्हा असे आवाहन अथर्व भागवत यांनी केले आहे. कोणाला मदत करायची असल्यास त्यांनी खालील नंबरवर संपर्क करावा असे ते म्हणाले. अथर्व-७८७५४८५८०५
www.konkantoday.com

