कणकवली नगरपंचायतीच्या मदतीने ‘कमळ’ थाळी सुरु
कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या गरीब मजुरांचे दोन वेळच्या जेवणाचेही हाल होत आहेत. हीच गरज ओळखून कणकवली नगरपंचायतीच्या मदतीने ‘कमळ’ थाळी सुरु करण्यात आली आहे.कणकवली नगरपंचायतीच्या सहकार्याने दररोज 150 व्यक्तींसाठी ‘कमळ’ थाळी सुरु करत आहोत. ही थाळी विनामूल्य असणार आहे, अशी घोषणा कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी काल केली होती. ‘या संकटाच्या काळात गरिबांना ‘कमळ’ थाळीमुळे नक्कीच मदत होईल!’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.कमळ’ थाळीमध्ये नेमकं काय? -दोन मूद भात, दोन चपात्या, एक वरण/डाळ (आमटी), एक भाजी
स्थळ : लक्ष्मी विष्णू हॉल, विद्यानगर (संजीवन हॉस्पिटलजवळ), कणकवली
वेळ : – दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत उपलब्द असणार आहे
www.konkantoday.com