कोरोनाची लागण झालेल्या
बाळावर स्वतंत्र कक्षात उपचार सुरू

साखरतर येथील सहा महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्यानंतर या बाळावर स्वतंत्र कक्षात उपचार सुरू असून वैद्यकीय पथक उपचार करीतआहे. तालुक्यातील साखरतर येथील दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांच्या कुटुंबातीलच सहा महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. साखरतरमध्ये आढळलेल्या पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा तो नातू आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील तीनजण कोरोनाबाधित झाले आहेत.
सहा महिन्यांचे बाळ पॉझिटिव्ह असल्याने जिल्हा रुग्णालयाने बाळाच्या आईलाही कोरोना प्रतिबंधक औषधे सुरु केली आहे. बाळासोबत आईला ठेवणे आवश्यक असल्याने त्यादृष्टीने आवश्यक उपायोजना केल्या जात आहेत. बाळाच्या आईची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली असली तरी बाळाचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याने आईची नव्याने कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. ज्यांनी ज्यांनी बाळाला हाताळले आहे त्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button