
एडीप व वयोश्री योजनेंतर्गत दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांच्या हस्ते सोमवारी मोफत साहित्य वाटप
*रत्नागिरी, दि. 15 : एडीप व वयोश्री या भारत सरकारच्या योजने अंतर्गत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मोफत साहित्य वाटपाकरिता तपासणी शिबिरात पात्र ठरलेल्या दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना उद्या सोमवार 16 जून रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबाव येथे साहित्य वाटप करण्यात येणार आहे. या वितरण शिबिराचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय स्वरूपा रविंद्र सामंत यांच्या हस्ते होणार आहे. तरी रत्नागिरी तालुक्यातील पात्र दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांनी आपले साहित्य स्वीकारण्यासाठी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजता या वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे.
खासदार नारायण राणे, खासदार सुनील तटकरे यांच्या प्रेरणेतून सामाजिक न्याय, अधिकारिता व दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग भारत सरकार आणि पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली ,भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम व समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने एडीप व वयोश्री या भारत सरकारच्या योजने अंतर्गत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मोफत साहित्य वाटपाकरिता तपासणी शिबिरांचे 24 फेब्रुवारी ते 6 मार्च 2025 या कालावधीत आयोजन करण्यात आले होते.
या तपासणी शिबिरात पात्र ठरलेल्या दिव्यांग तसेच 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना खालील वेळापत्रकानुसार होणाऱ्या शिबिरात साहित्य वितरण होणार आहे . लाभार्थींनी साहित्य स्वीकारण्यासाठी येताना तपासणी दरम्यान त्यांना मिळालेली पावती व आपले आधारकार्ड सोबत आणणे अनिवार्य आहे. जिल्ह्यातील वितरण शिबिरांचे वेळापत्रक तालुका निहाय खालील प्रमाणे राहील.
रत्नागिरी तालुका दि. 16 जून रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबाव. राजापूर तालुका दि. 18 जून रोजी सकाळी 10 ते 4 वाजता आबासाहेब मराठे कॉलेज हातीवले राजापूर. लांजा तालुका दि. 17 जून रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजता न्यू इंग्लिश स्कूल, लांजा. संगमेश्वर तालुका दि. 19 जून रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजता छत्रपती संभाजी महाराज सभागृह पंचायत समिती, देवरुख. चिपळूण तालुका दि. 20 जून रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजता ग्रामीण रुग्णालय कामथे, चिपळूण. गुहागर तालुका दि. 21 जून रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजता पंचायत समिती, गुहागर. दापोली तालुका दि. 23 जून रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, पंचायत समिती दापोली. मंडणगड तालुका दि. 24 जून रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, मंडणगड. खेड तालुका दि. 25 जून रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजता सभापती निवासस्थान पंचायत समिती खेड येथे एडीप व वयोश्री योजनेंतर्गत साहित्य वितरण करण्यात येणार आहे.