पोलीस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांचा पगार प्राधान्याने व्हायला हवा-मनसे नेते बाळा नांदगावकर
पोलिसांना दोन हफ्त्यात पगार मिळणार होता मात्र पहिला हफ्त्त्यातला पगार पोलिसांना मिळाला नाही. एक तारखेला पहिला हफ्ता मिळणार तर दुसरा १५ तारखेला मिळणार होता. काही जणांना अद्याप पगार मिळाला नाही अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.त्यामुळे सैन्य उपाशीपोटी लढू शकत नाही. विदर्भ, मराठवाड्यातील काही कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांना ताबडतोब पगार देणे गरजेचे आहे अन्यथा भविष्यात बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. राजकारण करायचं नाही तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहात पण पोलीस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांचा पगार प्राधान्याने व्हायला हवा. त्यांना पगार देण्याची व्यवस्था करावी. शरद पवार, सोनिया गांधी वेळ पडली तर पंतप्रधानांशीही मुख्यमंत्र्यांनी बोलावं पण या लोकांचा पगार तातडीने द्यावा अशी मागणी मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी केली आहे.
www.konkantoday.com