सिंधुदुर्ग जिल्हा प्रमाणे रत्नागिरी जिल्हा सुद्धा लवकरच कोरोना रुग्ण मुक्त होईल असा ना.उदय सामंत यांचा आशावाद
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाला रोखण्यासाठी जिल्ह्याचे प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीने काम करीत आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा प्रमाणेच रत्नागिरी जिल्हात सुद्धा लवकरच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा शून्यावर येईल असा आशावाद उच्चतंत्र शिक्षणमंत्री नामदार उदय सामंत यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत व्यक्त केला.यावेळी आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, जिल्हा परिषद सीईओ उपस्थित होते.तसेच उर्वरीत स्वॅबचे अहवाल मिरज येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यांचा अहवाल आज संध्याकाळपर्यंत प्राप्त होतील व ते ही निगेटिव्ह असतील अशी आशा सामंत यांनी व्यक्त केले. रत्नागिरी जिल्हा सध्या कुठच्या झोनमध्ये आहे याबाबतची अजून अधिकृत माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही .तो ऑरेंज झोनमध्ये आहे का? व त्यामध्ये कोणत्या सूट किंवा सवलती देता येतील याचे शासनाकडून मार्गदर्शन झाल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल.या बाबत आज संध्याकाळपर्यंत शासनाकडून मार्गदर्शक सूची उपलब्ध होईल असे सामंत यांनी सांगितले. तसेच आज आंबा बागायतदारांची बैठक चांगल्या वातावरणात पार पडली.या बैठकीमध्ये आंबा कॅनिंग व ऑनलाइन आंबा पेटय़ा विक्रीबाबतचे प्रश्न सोडवण्यात यश आले आहे.याशिवाय स्थानिक व्यापाऱ्यांच्या आंब्याचे नुकसान होऊ नये म्हणून रत्नागिरी एमआयडीसीतील एक्झॉटिक फ्रुट प्रोसेसिंग युनिट व पावस येथील क्लस्टर येथे आंबा कॅनिंगसाठी सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत.तसेच रत्नागिरी जिल्हय़ातील आंबा व्यापाऱ्यांना परराज्यात जाऊन आंबा विक्री करण्यासंदर्भात देखील चर्चा करण्यात आली.
www.konkantoday.com