
जिल्ह्यात सतत बदलते वातावरण, मोठ्या प्रमाणावर उष्मा तर अवकाळी पावसाच्या सरी
चिपळूण, दापोली, संगमेश्वर जिल्ह्यात गेलल्या काही दिवसांपासून उष्म्याचे प्रमाण वाढले असतानाच मंगळवारी मध्यरात्री चिपळूण, दापोलीत पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे जिल्ह्याच्या अनेक भागातील वीजपुरवठा काही तास खंडीत झाला होता. गुहागरासह संगमेश्वरातही मध्यरात्री रिमझीम पाऊस पडला. रत्नागिरी शहर परिसरातही बुधवारी दिवसभर मळभीचे वातावरण होते. बदलत्या वातावरणामुळे आंबा बागायतदार मात्र चिंताग्रस्त आहेत. www.konkantoday.com