‘मीच माझा रक्षक’पोलीस दलाच्या सुरक्षेसाठी रत्नागिरी पोलिसांनी केली सॅनिटायझेशन व्हॅनची निर्मिती ,जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे यांचा पुढाकार

मीच माझा रक्षक हे ब्रीद वाक्य घेऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस बंदोबस्त करणाऱ्या पोलीस दलाच्या सुरक्षेतेसाठी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे यांनी पुढाकार घेतला आहे कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन रत्नागिरी पोलीस दलातील अनेक पोलिस कर्मचाऱयांच्या सुरक्षितेसाठी म्हणून रत्नागिरी पोलिसांनी सॅनिटायझेशन व्हॅनची निर्मिती केली आहे

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडला आहे. संचारबंदी व जमावबंदीच्या आदेशामुळे पोलिस यंत्रणा दिवस-रात्र रस्त्यावर आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्‍न उभा राहिल्याने पोलिस दलाने सॅनिटायझेशन व्हॅन तयार केली असून, या व्हॅनमार्फत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पोशाखाचे निर्जंतुकीकरण झाल्याने त्यांना त्यांच्या घरी जाता येणे शक्‍य होणार आहे.
पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी सॅनिटायझेशन व्हॅनची निर्मिती करण्यात आली असून त्याचा शुभारंभ नुकताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे यांच्या हस्ते पार पडला
विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. संचारबंदीमुळे रस्त्यावर उतरलेल्या या हजारो पोलिसांना या विषाणूचा संसर्ग होण्यापासून संरक्षण होण्याची गरज होती पोलिस अधिकारी व कर्मचारी सतत रस्त्यावर नाकाबंदी, गस्त घालत असून, घराबाहेर पडणाऱ्यांच्या संपर्कात येतात. त्यामुळे त्यांनाही कोरोनाचा धोका संभवतो. खबरदारी म्हणून पोलिस प्रशासनाने पोलिसांना मास्क, सॅनिटायझर पुरविले असून, नागरिकांपासून सुरक्षित अंतर राखून संवाद साधण्याचे आवाहन केले आहे.
सॅनिटायझेशन व्हॅनच्याउपक्रमाबाबत बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. प्रवीण मुंडे सांगितले की आज रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरले आहेत शेवटी त्याच्या सुरक्षिततेचीही काळजी घेणे आवश्यक होते अशा प्रकारच्या व्हॅनची निर्मिती करणेत यावेत अशा वरिष्ठांच्या सूचना होत्या कोरोना रुग्ण सापडल्याने रत्नागिरी शहरातील राजिवडा, साखरतर येथील भाग सील करण्यात आला आहे त्यामुळे तेथे रात्रंदिवस पोलीस बंदोबस्तासाठी आहेत अशा पोलिसांच्या सुरक्षितेसाठी व्हॅन उपयोगी पडणार आहे बंदोबस्तामुळे या पोलिसांना जागेवरून हलणे शक्य नसल्याने त्यांच्या पर्यंत सॅनिटायझेशन व्हॅन पोहोचणार आहे त्या ठिकाणी बंदोबस्तात असलेले पोलिस व्हॅनमध्ये जाऊन सॅनिटायझेशन करतील त्यामुळे पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे तसेच त्यांना एक प्रकारे सुरक्षिता निर्माण झाली आहे रत्नागिरी शहरात बंदोबस्तासाठी विविध वीसबावीस पॉइंट तयार करण्यात आले असून त्या ठिकाणी हे मोबाईल व्हॅन जाऊन बंदोबस्त असलेल्या पोलीस कर्मचाऱयांना सॅनिटायझेशन सेवा उपलब्धद करून देत आहे
व्हॅनमध्ये सोडियम हायपोक्‍लोराईड, सोप सोल्यूशन आणि पाणी यांचा फवारा करून स्प्रिंकल द्वारे पोलिसांच्या अंगावर सॅनिटायझेशन केले जात आहेत.
पोलीस हा देखील माणूस आहे त्यालाही मुले बाळे व कुटुंब आहेत त्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा पोलीस प्रमुखांनी उचललेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button