रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात माजी खासदार नीलेश राणे यांच्या माध्यमातून पीपीई कीट उपलब्ध

0
628

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णात वाढ होत असताना त्या रुग्णांना उपचार करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितता आणि आरोग्याची खबरदारी लाईफ टाइम हॉस्पिटलचे संचालक, भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी घेतली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात पी पी इ किट उपलब्ध करून दिले आहेत.

सध्या सगळे जग कोरोनाशी लढत आहे. राज्यासह रत्नागिरीमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या रुग्णांची आणि सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याची खबरदारी घेतली जात आहे. मात्र त्याचवेळी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे आरोग्यही तितकेच महत्वाचे आहे. हीच गोष्ट अचूकपणे हेरून भाजपा नेते निलेश राणे यांनी रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर्स, कर्मचारी यांच्यासाठी पी पी ई किट उपलब्ध करून दिले आहेत. समाजासाठी लढणाऱ्या घटकांना आपण देणे लागतो हि गोष्ट लक्षात ठेवून निलेश राणे यांनी हे किट उपलब्ध करून दिले. या पीपीई किटमध्ये गॉगल, वेस्ट कलेक्शन बॅग, सर्जिकल गाऊन विथ हूड कव्हर, ग्लोव्हज, शुकव्हर आशा गोष्टींचा समावेश आहे.
रविवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक बोलडे, डॉ सुभाष चव्हाण आणि रत्नागिरी जिल्हा डॉक्टर्स असोसिएशनचे सदस्य डॉ. अभय धुळप, यांच्या उपस्थितीत ते जिल्हा रुग्णालयात सुपूर्त करण्यात आले. हे किट उत्कृष्ट दर्जाचे असून याचा उपयोग कर्मचाऱ्यांना निश्चित होईल असे डॉ बोलडे यांनी निलेश राणे यांच्याशी दूरध्वनीवर बोलताना सांगितले आणि आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here