मासळी मिळू लागलीम्हणून मालकाने खलाशांना रत्नागिरीहून बोलावले ,पण त्यांना व्हावे लागले क्वारंटाइन
मालवण परिसरात समुद्रात मासळी मिळू लागल्याचा रिपोर्ट आल्यानंतर मालवणातील ट्रॉलर मालकाने रत्नागिरीत गावाला गेलेल्या आपल्या दहा -बारा खलाशांना बोलावून घेतले हे खलाशी ट्रॉलरने आपल्या गावाला म्हणजे रत्नागिरी परिसरात आले होते मासळी मिळत असल्याचा रिपोर्ट आल्याने व मालकाचा निरोप आल्याने हे खलाशी ट्रॉलर मधून मालवणला आले रत्नागिरी जिल्ह्यात एका काेराेना रुग्णाचा मृत्यू झाल्याने व त्या परिसरातून हे खलाशी आले आहेत हे कळताच सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली मत्स्य विभागाने तातडीने हालचाली करून मालकाला सांगून संबंधित खलाशांची तातडीने ग्रामीण रुग्णालयात तपासणी करण्याचे आदेश दिले तसेच या खलाशांना आता तेथेच विश्रामगृहात क्वारंटाइन कक्षात ठेवण्यात आले आहे
www.konkantoday.com