चिमुकलीला काय माहीत…
तिचा बाबा किती कष्ट करतो,
कुटुंबासाठी दिवस रात्र तो झटतो…
चिमुकलीला काय माहीत…
तिचा बाबा किती अपमान पचवतो
मुलांच्या स्वप्नांसाठी रोज रक्त अटवतो..
चिमुकलीला काय माहीत…
तिचा बाबा किती संघर्ष करतो
भलं होईल म्हणून रोज मर मर मरतो…
चिमुकलीला काय माहीत…
तिचा बाबा किती विनवण्या करतो
घर चालावं म्हणून वरिष्ठांच्या पाया पडतो
चिमुकलीला काय माहीत…
तिचा बाबा किती मोठी स्वप्न पाहतो
पूर्ण करण्या त्यांना जीवाचं रान करतो ..
चिमुकलीला काय माहीत…
तिचा बाबा वयाने रोज थोडा वाढतो
थकून घरी आल्यावर धपकन पडतो..
चिमुकलीला काय माहीत…
तिचा बाबा रोज किती दुःख पचवतो
प्रत्येक अश्रूला तो डोळ्यामाघे लपवतो..
चिमुकलीला काय माहीत…
तिचा बाबा कधी कधी उपाशी राहतो
तरी पिलांच्या चोचीत घास तो भरवतो..
चिमुकलीला काय माहीत…
तिचा बाबा एक दिवस वयोयुद्ध होतो
आयुष्यभर झीजून या जगाचा निरोप घेतो…
लेखन –
प्रा. श्री सचिन कोल्हे पाटील
प्रेरणादायी वक्ता
मो.९४२१८३२३७६