
कोकणात येणाऱ्या पर्यटकांना महिला बचतगटाच्या माध्यमातून हाऊसबोट रत्नागिरीलगतच्या खाड्यांची सैर घडवणार.
कोकणात येणाऱ्या पर्यटकांना उमेद प्रकल्पांतर्गत महिला बचतगटाच्या माध्यमातून हाऊसबोट रत्नागिरीलगतच्या खाड्यांची सैर घडवणार आहे. येथील कांदळवन आणि समुद्रालगतच्या खाडी परिसरातील कोकण परजिल्ह्यांतील पर्यटकांना पाहायला मिळणार असून, याद्वारे रोजगारही मिळणार आहे.हाऊसबोट प्रकल्पासाठी चार दिवसांपूर्वी एक बोट जयगड येथील खाडीत दाखल झाली आहे. ही बोट कोतवडे प्रभाग संघाला चालवण्यासाठी दिली आहे.
जयगड खाडीतील सैतवडे व राई या परिसरातील पहिला प्रकल्प येत्या काही दिवसांत कार्यान्वित होणार आहे. त्याची पहिली चाचणी पूर्ण झाली आहे.कीर्ती किरण पुजार यांनी सैतवडे ते राई अशी बोटीमधून फेरी मारली. यावेळी प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, जिल्हा अभियान व्यवस्थापक आयाज पीरजादे, जिल्हा व्यवस्थापक विपणन अमोल काटकर, अभियान व्यवस्थापक विशाल लांजेकर उपस्थित होते. पुढील आठ दिवसांत उर्वरित चाचण्या घेतल्यानंतर ही बोट कार्यान्वित हाेणार आहे.