चिपळूण-कुटरे फाटा येथील अपघातात राजापुरातील एकजण ठार, ट्रकचालकावर गुन्हा

चिपळूण : मुंबई – गोवा महामार्गावरील चिपळूण-कुटरे फाटा येथे एसटी बसच्या मागे उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना रविवार १ मे रोजी सकाळी ६.३० वा. च्या सुमारास घडली. या अपघातात २ जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एसटी बस चालक शशिकांत भोईनवाड (वय ३३, कल्याण, ठाणे ) हे आपल्या ताब्यातील बस घेऊन चिपळूण ते रत्नागिरी असे जात होते. यावेळी कुटरे फाटा येथे प्रवासी उतरवण्यासाठी बस थांबली. याचवेळी मुंबईहून -गोव्याकडे जाणाऱ्या ट्रक चालक नागनाथ बोयने (वय ३५, कर्नाटक) बेदरकारपणे गाडी चालवून एसटी बसच्या मागे उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार सादिक आरिफ सोलकर (वय २५. रा. कातळी , राजापूर ) याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या दुचाकीच्या मागे बसलेल्या जिदान सोलकर (१७ ) , खलिजा जैनुद्दीन सोलकर (वय १५ , दोन्ही, भोगाळे, चिपळूण ) यांना दुखापत झाली. पोलिसांनी ट्रक चालक नागनाथ बोधने याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button