
महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीमुळे कोकण टुडेच्या बहुतांश वाचकांचा लॉकडाउन वाढवण्यात यावा असा कल
राज्यात सध्याची परिस्थिती पाहता १५एप्रिलपासून लॉकडाउन उठवण्यात यावे का ?असा कोकणटुडेच्या वतीने आमच्या असंख्य वाचकांकडून जनमत मागवण्यात आले होते. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोराेनाचा फैलाव वाढत असून मुंबईपासून महाराष्ट्रात दररोज असंख्य काेराेना रुग्णांची भर पडत आहेत रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत पाच काेराेनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत त्यातील एक रुग्ण बरा झाला आहे.जर लॉकडाउन उठवला तर कोराेनाचा फैलाव मोठय़ा प्रमाणावर होईल अशी भीती सर्वांना असल्यामुळे ८५टक्के वाचकांनी लॉकडाउन उठवू नये असे मत व्यक्त केले आहे.असे असले तरी लॉकडाउन असल्याने वेगवेगळे व्यवसाय दुकाने खासगी उद्योग बंद व ठप्प झाले आहेत.त्यामुळे सर्वांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे.तसेच रोजंदारीवर असलेल्यांवर मोठी बिकट अवस्था झाली आहे.त्यामुळे १५टक्के वाचकांनी हा लॉक डाउन उठवावा असे मत नोंदविले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी देशातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असुन लवकरच ते लॉकडाउन बाबत निर्णय जाहीर करणार आहेत
www.konkantoday.com