सिंधुदुर्गातही मास्क वापरणे बंधनकारक

0
330

सिंधुदुर्गातही मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे कोणत्याही व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी जाताना तीन पदरी मास्क, साधा कपडी मास्क किंवा रुमाल, किंवा कापडाने नाक व तोंड झाकून वावरणे बंधनकारक करण्यात आले आहे. वापरण्यात येणारे मास्क हे प्रमाणित असलेल्या कोणत्याही औषध दुकानात मिळणारे किंवा घरगुती त्यार करण्यात आलेल्या कापडाचे, रुमालाचे धुण्यायोग्य असावेत, त्याचा पुनर्वापर करताना स्वच्छ धुवून निर्जंतुकीकरण करुन वापरावेत. वापरलेले मास्क इतरत्र टाकू नयेत, ते जाळून नष्ट करावेत. नागरिकांनी, शासकीय, निमसाशकीय, खाजगी कर्मचाऱ्यांनी कार्यालयाच्या वाहनातून, कार्यलय परिसरात प्रवास करताना, काम करताना, बैठकीच्या वेळी किंवा कोणत्याही दोन व्यक्तींनी एकत्र येताना सुरक्षित ठेवणे व मास्क वापरणे बंधनकारक आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here