
दापोली तालुक्यात हाेम क्वारंटाइन केलेल्या व्यक्तीचा मृत्यू ,मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नाही
दापोली तालुक्यातील बुरोंडी तेलेश्वर नगर परिसरात राहणाऱया व सध्या होम क्वारंटाइन करून ठेवलेल्या ५५वर्षीय व्यक्तीचा काल रात्रि अचानक मृत्यू झाला मात्र त्याचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही सदरची व्यक्ती मुंबई घाटकोपर परिसरातून गावी आली होती या प्रकारामुळे दापोली प्रशासनाची धावपळ उडाली खबरदारीचा उपाय म्हणून या व्यक्तीचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे तसेच खबरदारी म्हणून या व्यक्तीचा संबंधित काही जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे प्रशासनाने दक्षता म्हणून निर्जंतुकीकरण व रस्ते बंद केले आहेत मात्र या व्यक्तीच्या मृत्यूचे कारण अद्याप कळलेले नाही त्यामुळे कोणीही अफवा पसरवू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात
आले आहे
www.konkantoday.com